Gangkhed Accident;ट्रक-दुचाकीची भीषण धडक; दोन पालीका कर्मचारी ठार

Spread the love

परभणी,१६ जुलै (प्रतिनिधी)

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरातील महाराणा प्रताप चौकात गुरुवारी ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंगाखेड नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.
संतोष साळवे आणि शेख मुनवर शेख छोटू मिया (बरकत नगर, दत्तमंदिर परिसर, गंगाखेड) अशी त्या दोघां मयतांची नावे आहेत. दोघेही गंगाखेड नगरपरिषदेत कर्मचारी म्हणून कार्यरत होते.प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक MH 22 AX 0574 तर ट्रकचा क्रमांक MH 38 X 9977 असा आहे. ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक झाल्याने दोघांचाही चेंदामेंदा खून घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या भीषण घटनेमुळे गंगाखेड शहरात हळहळ व्यक्त केली जात असून नगरपरिषद कर्मचारी व नागरिकांनी दोन्ही दिवंगत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास गंगाखेड पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page