जिल्हाधीका-यांच्या हस्ते एसआयआर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Spread the love

-दावे-हरकतींसाठी महिनाभराची मुदत

परभणी/,ता.१ (प्रतिनिधी)
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी(दि. ३१ ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात आली. मतदारांनी प्रारूप यादीत आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून काही त्रुटी असल्यास किंवा पात्र असूनही नाव समाविष्ट नसल्यास ३० सप्टेंबरपर्यंत विहित नमुन्यात दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

प्रारुप याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, मतदान केंद्र येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादीची प्रत देण्यात आली. तसेच दावे व हरकती दाखल करण्याची प्रक्रिया, नो मॅपिंग, ॲनोमली, अनुपस्थित / शोधूनही न सापडलेले, कायमस्वरूपी स्थलांतरित, मयत, अन्यत्र मतदार म्हणून नोंद तसेच अनकलेक्टबल इएफएस बाबतची कार्यवाही आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

-परभणी जिल्हयातील एसआयआर स्थिती
परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १५ लाख ४१ हजार ७ मतदार असून १ हजार ६२३ बीएलओ कार्यरत आहेत. सर्व बीएलओकडून ईएफ फॉर्म डाउनलोडचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून छपाई व वितरणही १०० टक्के पूर्ण झाले आहे. यापैकी १३ लाख ६० हजार ७५८ ईफचे डिजिटायझेशन व पडताळणी पूर्ण झाली असून त्याचे प्रमाण ८८.३० टक्के आहे.

-विधानसभा मतदारसंघनिहाय नोंदी
जिंतूर – २ हजार ७६५, परभणी – ८हजार ७४०, गंगाखेड – १ हजार ३८७, पाथरी – ३ हजार ६२६, एकूण – १६ हजार ४२८ तर अँनॉमली नोंदींची संख्या जिंतूरमध्ये १ हजार ५७२, परभणीत ५२६, गंगाखेडमध्ये १हजार ११ आणि पाथरीमध्ये २ हचार २१९ असून जिल्ह्यातील एकूण नोंदी ५ हजार ३२८ आहेत. तर बैठकीत अनकलेक्टेबल ईएफ बाबतही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. त्क्षानुसार ४२ हजार ५७४– अनुपस्थित / शोधूनही न सापडलेले, ७३ हजार ६२८ – कायमस्वरूपी स्थलांतरित, ३७ हजार ४०८ – मयत, २५ हजार ९८३ – अन्यत्र मतदार म्हणून नोंद व ६५६ – इतर प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये, यासाठी संबंधित पात्र मतदारांना विहित प्रक्रियेद्वारे आवश्यक अर्ज दाखल करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

-जिल्हाधिकारी चव्हाण यांचे मतदारांना आवाहन
मतदार यादी अचूक, पारदर्शक व सर्वसमावेशक असणे ही मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेची मूलभूत आवश्यकता आहे. परभणी जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत राहणे तसेच अपात्र नोंदींची नियमानुसार पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी व बीएलए यांनी प्रारूप मतदार यादीचे सूक्ष्म परीक्षण करावे. पात्र मतदारांचे नाव समाविष्ट करण्यासाठी तसेच चुकीच्या नोंदींबाबत विहित पद्धतीने दावे व हरकती दाखल करण्यासाठी मतदारांना मार्गदर्शन करावे.


You cannot copy content of this page