परभणी;प्लास्टिक विरोधात महापालिकेची धडक कारवाई

Spread the love

₹२५ हजारांचा दंड, ५५ किलो प्लास्टिक जप्त

परभणी, दि. २ जुलै : महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर व उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, उपायुक्त तुकाराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका पथकाद्वारे गुरुवारी (२ जुलै) जुन्या मोंढा परिसरात सिंगल युज प्लास्टिकविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविली.

मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कोंडवाडा प्रमुख विनय ठाकूर, शहर समन्वयक तुराब खान, स्वच्छता निरीक्षक न्यायरत्न घुगे, स्वच्छता निरीक्षक राजू झोडपे व सौरभ सूर्यवंशी यांच्या पथकाने एकूण ३७ दुकानांची तपासणी केली.तपासणीदरम्यान ३ दुकानांमध्ये सिंगल युज प्लास्टिकचा वापर आढळून आला. यापैकी दोन दुकानांवर यापूर्वीही कारवाई झाल्याने प्रत्येकी ₹१० हजार असा एकूण ₹२० हजारांचा दंड आकारण्यात आला. तर प्रथमच नियमभंग करणाऱ्या एका दुकानावर ₹५ हजारांचा दंड करण्यात आला. अशाप्रकारे एकूण ₹२५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.या कारवाईत ५५ किलो सिंगल युज प्लास्टिक, तसेच पाणी पाऊचचे ११ पोते व खुले पाणी पाऊच जप्त करण्यात आले.या मोहिमेत प्रभाग समिती ‘ब’ मधील कर्मचारीही सहभागी झाले होते. नागरिक व व्यापाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, अन्यथा नियमभंग करणाऱ्यांवर यापुढेही कठोर दंडात्मक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा महानगरपालिकेने दिला.

You cannot copy content of this page