दहशत का दुसरा नाम ‘तुकाराम मुंढे’पुर्णेत एफडीएच्या कारवाईने खळबळ

Spread the love

हाँटेल,फळविक्रेते,हाॅस्टेलच्या मेसची तपासणी; अस्थापना दिवसभर बंद

पुर्णा,ता.२६(प्रतिनिधी)

अन्नभेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने पुर्णा शहरात शुक्रवारी (ता. २६) धडक तपासणी मोहीम राबविल्याने व्यापारी व खाद्य व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. शहरातील विविध आस्थापनांवर अचानक छापे टाकून नमुने संकलित करण्यात आल्याने अनेक हॉटेल्स, फळविक्रेते व पानटपऱ्या दिवसभर बंद ठेवण्यात आल्या. शहरात सर्वत्र एफडीएच्या कारवाईचीच चर्चा रंगली होती.

        एफडीएचे पथक शुक्रवारी दुपारपासून पुर्णा शहरात दाखल झाले. या पथकाने शहरातील फळविक्रेते, हॉटेल्स, कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या वसतिगृहासह काही ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याची तपासणी केली. यावेळी परभणी येथील अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे, कृष्णा मुळे,तुषार धोपे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने विविध खाद्यपदार्थांचे नमुने संकलित करून ते प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविले.एफडीएचे पथक शहरात दाखल झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच अनेक आस्थापनाधारकांनी संभाव्य कारवाईच्या भीतीने दुकाने व हॉटेल्स तातडीने बंद केली. परिणामी काही काळ शहरातील व्यावसायिक व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झिरो फाटा रोडवरील ब्रम्हनाला परिसरात नाल्यात फेकण्यात आलेल्या खारी, ब्रेड व टोस्टच्या पाकिटांचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. घटनास्थळावरून नमुने गोळा करून ते तपासणीसाठी हस्तगत करण्यात आले आहेत.

        “अन्नभेसळ करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. सर्व व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करूनच व्यवसाय करावा,” असे आवाहन अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

You cannot copy content of this page