वडिलांच्या निधनाचा धक्का;वकील पुत्राने उचलले टोकाचं पाऊल

Spread the love

गळफास लाऊन केली आत्महत्या; परभणीच्या गजानननगरातील घटना; नानलपेठ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

परभणी, ता. २७ (प्रतिनिधी) : वडिलांच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्यातून नैराश्यात गेलेल्या एका वकील पुत्राने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

देवराज नागोराव अन्नपूर्णे (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. त्या घटनेनंतर ते मानसिक तणावाखाली व नैराश्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.गुरुवारी रात्री ११ वाजल्यापासून ते शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान गजानननगर येथील स्वतःच्या राहत्या घरी त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले.

या प्रकरणी मयताचे साडू बळीराम पतंगे यांनी दिलेल्या माहितीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गुरसुडकर हे करीत आहेत.

You cannot copy content of this page