Murder कौटुंबिक वादातून मेहुण्याचा खुन..!
परळी तालुक्यातील जळगव्हाण येथिल घटना; मारेकरी सिरसाळा पोलीसांच्या ताब्यात
परळी वैजनाथ ता.२२(प्रतिनिधी)
तालुक्यातील जळगव्हाण येथे कौटुंबिक वादातून मेहुण्यावरच कोयत्याने सपासप वार करुन, खुन केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले असून,या प्रकरणी परळीच्या सिरसाळा पोलीसांनी मारेक-यास परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथून ताब्यात घेत जेरबंद केले आहे.
परळी तालुक्यातील जळगव्हाण तांडा भीमराव शिवाजी राठोड (वय २६) वर्षं असं त्या मयत तरुणाचे नाव आहे. मयत तरुण व अनिल बाबासाहेब चव्हाण या दोघांत कौटुंबिक कारणामुळे वाद झाला होता.याच वादातून कोयत्याने भीमराव राठोड याचा कोयत्याने सपासप वार करून खून झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास अनिल बाबासाहेब चव्हाण (वय ३०) याने त्याचा मेहुणा भीमराव शिवाजी राठोड (वय २६) याच्या डोक्यावर, मानेवर कोयत्याने सपासप वार करून संपवलं. आरोपीस सोनपेठ येथून ताब्यात घेण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक गोष्टीतून अनिल चव्हाण आणि भीमराव राठोड यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं होतं. या भांडणातून चिडलेल्या अनिलने भीमराव यांच्या डोक्यावर आणि मानेवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात भीमराव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळी फरार झाला होता. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी अनिल याला सोनपेठ येथून ताब्यात घेण्यात आलं. सिरसाळा पोलिस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव राठोड यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी अंबाजोगाई येथील रुग्णालयात करण्यात आली आहे.












