परभणीत अंबेजोगाईत एटीएम फोडणारे परभणी स्था.गु.शा पोलिसांच्या ताब्यात…!
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
मानवत, पाथरी येथील चोरटे
परभणी : शहरातील नवा मोंढा परिसरात झालेल्या एटीएम फोडीच्या घटनेचा तपास करत असताना परभणी स्थागुशाच्या पथकाने अंबेजोगाई येथे झालेल्या एटीएम फोडीच्या प्रयत्नातील चार चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. हे चोरटे परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी तालुक्यातील आहेत. संबंधितांना पुढील तपासासाठी अंबेजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.परभणी शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या युको बँकचे एटीएम फोडून साडे पाच लाखाची रोकड लंपास करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास स्थागुशाचे पथक करत आहेत. तपासात असलेल्या पथकाने अंबेजोगाई शहर येथे २ जुलै रोजी एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. सायरन वाजल्याने चोरटे पळाले होते. या चोरट्यांना परभणीच्या पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये गणेश बालासाहेब काळे, राजेश बाबासाहेब कांबळे, विवेक बबन धारे, मुंजाजी लक्ष्मण आरसाड सर्व रा. कोल्हा ता. मानवत, परमेश्वर सोनाभाऊ बनगर, विष्णू नारायण भिसे दोघे रा. झरी. ता. पाथरी या चोरट्यांचा सहभाग असल्याचे उघड केले. चार चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी अंबेजोगाई पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. ही कारवाई स्थागुशाचे पोउपनि. चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार केशव लटपटे, महेश कवठाळे, विलास सातपुते, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, सिध्देश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ, मधुकर ढवळे, विष्णू चव्हाण, गजानन क्षिरसागर, सुर्यकांत सातपुते, राहुल परसोडे, माणिक वाघ, दिलीप निलपत्रेवार यांच्या पथकाने केली.











