Parbhani Ejtema;मानवता आणि बंधुभावाचा संदेश देत झरीतील इज्तेमाचा समारोप
देशाच्या शांतता, सौहार्द व समृद्धीसाठी विशेष दुआ;हजारों मुस्लिम बांधंवांची उपस्थिती
परभणी, दि. २१ (प्रतिनिधी) :
परभणी तालुक्यातील झरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य इज्तेमा कार्यक्रमाचा मंगळवारी हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत शांततापूर्ण वातावरणात समारोप झाला. कार्यक्रमात ईमान, मानवता, बंधुभाव, समाजसेवा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला.
पुणे येथील धर्मगुरूंनी मार्गदर्शन करताना सर्व धर्म प्रेम, सहकार्य आणि सदाचाराची शिकवण देतात, असे सांगत समाजात सौहार्द टिकविण्याचे आवाहन केले. गरजू, अनाथ, विधवा आणिआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे हीच खरी इबादत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.समारोपावेळी देशात शांतता, बंधुभाव आणि सर्वधर्मीय ऐक्य नांदावे, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी लाभावी यासाठी विशेष दुआ करण्यात आली.कार्यक्रमासाठी स्वयंसेवकांनी पाणी, भोजन, आरोग्य, स्वच्छता, वाहनतळ व सुरक्षा व्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन केले होते. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.











