Parbhani;१४ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार

Spread the love

पुर्णा तालुक्यातील घटना;वडीलांना जीवे मारण्याची दिली धमकी; एका विरुद्ध गुन्हा दाखल

पुर्णा,ता.१८(प्रतिनिधी)

शिकवणीला बसलेल्या एका १४ वर्षीय शाळकरी मुलीला  एका नराधामाने  तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचं आहे,असे सांगून तीला बळजबरीने परिसरात असलेल्या एका उसाच्या शेतात नेऊन तुझ्या वडिलांना व भावाला जीवे मारण्याची धमकी देत तीच्या सोबत बळजबरीने अत्याचार करुन घटनास्थळावरून पसार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले असून,याप्रकरणी पुर्णा पोलीस ठाण्यात पिडीतेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       हाती आलेल्या प्रार्थमिक माहिती नुसार,पुर्णा शहरापासून जवळच असलेल्या एका गावातील १४ वर्षीय तरुणी ही (ता .१४) जुलै रोजी सायं ५ वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे गावातील एका शिक्षकांकडे शिकवणीला बसली होती.त्यावेळी जुन्या ओळींतील हिंगोली जिल्ह्यातील पळशी येथिल सोहम एंगडे हा तिथे आला व पिडीतेला मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचं आहे असे म्हणुन तीचा हात धरून बाजुला असलेल्या उसाच्या शेतात घेऊन गेला.त्याने पिडीता अल्पवयीन असतानाही तीचे वस्त्र काढून बळजबरीने अत्याचार केला ही घटना कोणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना व भावाला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली.या घटनेनंतर घाबरलेल्या पिडीतेने आपल्या आईवडिलांना सोबत घेऊन संबंधित प्रकार पुर्णा पोलीसांना कळवला.पोलीसांनी संबंधितांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोहम एंगडे रा.पळशी ता.वसमत जि.हिंगोली याचे विरोधात बाल लैंगिक अत्याचार करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे.घटनेचा तपास पुर्णा पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page