जलसंधारण सप्ताह;पुर्णेतील रामापुरात जलपूजन कार्यक्रम

Spread the love

जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे,गटविकास अधिकारी नारायण मिसाळ,जलसंधारण अधिकारी कुंभार यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

पुर्णा,ता.२०/प्रतिनिधी
जलसंधारण सप्ताहानिमित्त पुर्णा तालुक्यातील रामापुर येथेजल पुजनाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, जलसंधारण अधिकारी व गटविकास अधिकारी या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

महाराष्ट्र जलसंधारण विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी पुर्णा तालुक्यातील रामापुर येथे मंगळवारी (ता.१८) रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष लताताई वाकळे, जिल्हा परिषद सदस्य संजय जल्लारे, गटविकास अधिकारी नारायण मिसाळ, जलसंधारण अधिकारी कुंभार, माजी उपसभापती सुरेश गिरी, ग्राविकास अधिकारी कुरुडे, सरपंच गणेशराव अवकाळे, चव्हाण, भुसारे, संजय खंदारे, मनोहर जाधव आदी उपस्थित होते. तसेच गावातील कामाजी डुबे, उत्तमराव डुबे, बालाजी डुबे, मुंजाजी डुबे, बाबुराव डुबे, बळीराम डुबे, दतराव डुबे, विठ्ठलराव हसरगोंडे, समाधान वाघमारे, गोपाळ शिंदे, सोपान गिरी, आनंद देवा, प्रदुम्न पाचकोर, पिराजी राऊत, भैया खंदारे, मधुकर माघाडे, अंकुश माघाडे, नामदेव माघाडे, करण शिराळे, दासराव डुबे, बालाजी डुबे, पवन डुबे, आतम शिंदे, बंटी वाघमारे, संतोष माली पाटील आदी गावकरी मंडळी उपस्थित होती.

You cannot copy content of this page