श्री गजानन महाराज पालखी सोहळाचे ४ रोजी परभणी जिल्ह्यात आगमन..

Spread the love

शेगांव ते पंढरपूर पायीवारी सोहळ्याचे ५७ वे वर्ष; सोहळा ४ दिवस मुक्कामी

पूर्णा ता.८(प्रतिनिधी)

पढंरीवारीसाठी शेगावीचे राणा संत श्री गजानन महाराज आपल्या दिमाखदार पायी पालखी सोहळ्यासह शेगांव येथून  २३ जुन रोजी मार्गस्थ झाले आहेत. हा पालखी सोहळा मराठवाड्याच्या भुमीत पानकन्हेरगांव येथे १ जुलै रोजी दाखल झाला असून तर ४ जुलै रोजी परभणी जिल्ह्यातील झिरोफाटा मार्गे श्रीक्षेत्र त्रिधारा येथे पहील्या मुक्कामी असणार आहे.पालखी सोहळा जिल्ह्यातील परभणी,गंगाखेडसह ४ दिवस मुक्कामी असणार आहे.यामुळे भक्तगणांनी ठिक ठिकाणी सोहळ्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

      भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडावी आणी वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी यासाठी मागील ५६ वर्षांपासून निरंतर शेगांवच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने शेगांव-पंढरपूर पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केलं जातं आहे.या सोहळ्याचे दिमाखदार सोहळ्याचे हे ५७ वे वर्ष असून, ७०० हुन अधिक भाविक व लवाजम्या सह अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने  शेगांव येथील मंदिरातून ही दिंडी मजल दर मजल करत बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर आणि जालना अशा नऊ जिल्ह्यांतून पालखीचा ६० दिवसांचा आणि एकूण १ हजार २०६ किलोमीटरचा प्रवास पायी प्रवास करत  आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहचणार आहे.विदर्भातुन श्रींचा पालखी सोहळा १ जुलै रोजी मराठवाड्यातील पानकनेरगांव येथे दाखल झाला असून त्यादिवशी सेनगांवात पालखीचा मुक्काम असणार आहे. २ रोजी पालखी दुपारी श्री संत नरसी नामदेव येथे तर ३ जून रोजी पालखी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथून दर्शन घेऊन जवळा बाजार येथे मुक्काम ठोकणार आहे.जवळा बाजार येथून श्रींची पालखी ४ रोजी सकाळी  बाराशिव हनुमान, आडगांव रंजेबुआ,हट्टा येथून पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.यानंतर पालखी सोहळा श्रीक्षेत्र त्रिधारा येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी परभणी येथे असणार आहे. यानंतर सोहळा पोखर्णी ,दैठणा मार्गाने (खळी) गंगाखेड येथे ७ जुलै रोजी रात्री मुक्काम करून पुढे बिड जिल्ह्यातील परळी वैजनाथ, अंबाजोगाई ,कळंब मार्गे सोलापूर जिल्ह्यातून पंढरीकला २३ जुलै रोजी  पोहचणार आहे.

परभणी-हिंगोली  जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या पूर्णा तालुक्यात झिरोफाटा येथून पालखी सोहळा ४ जुलै रोजी भारतीकॅम्प येथे काही क्षण विसाव्यास असणार असुन,.. पूर्णा तसेच एरंडेश्वर येथिल भाविकांकडून सेवा केली जाणार आहे.त्याची जय्यत तयारी  सध्या केली जात आहे.

     ‌‌

You cannot copy content of this page